गडहिंग्लज : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने आणि आयकर विभागाने एकत्रितरीत्या पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अप्पासाहेब नलावडे साखर करखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. जवळपास आयकर विभागाचे २० अधिकारी आज पहाटे ६.३० वाजता हसन।मुश्रीफ यांच्या घरी आले व तपासणी सुरू केली. घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे मुश्रीफ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे व आता मुश्रीफ यांच्या घराबाहेर हजारोने नागरिक जमा झाले आहेत व त्यांनी कागल बंदची घोषणा दिली तसेच आता गडहिंग्लज मध्ये देखील गडहिंग्लज बंद ची घोषणा गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत करण्यात आली आहे. घरामध्ये एके 47 रायफली तैनात केलेले पोलीस लावून अश्या पद्धतीने दहशत माजवून एका चांगल्या नेत्याला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने हे छापे घातले आहेत व त्याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज शहर आज बंद ठेवावे असे आवाहन करण्यात आले.