गडहिंग्लज, ता. २७ : येथील जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला. तहसीलदार दिनेश पारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री पारगे म्हणाले, "लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले बहुमूल्य मत योग्य व्यक्तीला द्या. कशालाही बळी न पडता मतदान करा." आर. बी . लोखंडे, साक्षी पाटील, श्रेया गुरव, सलमा सनदी, पल्लवी वाळकी यांचीही भाषणे झाली. नायब तहसीलदार राजेंद्र यादव, आर. आर. कोरवी आदी उपस्थित होते. प्राचार्य विजय चौगुले यांनी स्वागत केले. एम. एच.भोये यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश हारकारे यांनी आभार मानले.