गडहिंग्लजला सोमवारी महिला लोकशाही दिन

KolhapurLive

गडहिंग्लज : पंचायत समितीच्या एकात्मिक  बालविकास विभागाच्यावतीने ३० जानेवारी रोजी येथील  तहसिल कार्यालयात महिला लोकशाही दिन  आयोजीत करण्यात आला आहे.  सकाळी ११ वाजता  तहसीलदार दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील  समस्याग्रस्त,पीडित महिलांचे  प्रश्न, तक्रारी, शासकीय योजनेतील येणाऱ्या अडीअडचीणी सोडवणूक व महिला मार्गदर्शन केले जाणार आहे. या लोकशाही दिनाच्या बैठकीला उपस्थितीत राहून समस्यांचे निरसन करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पत्रकातून केले.