गडहिंग्लज, ता. २७ : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे होणार आहे. रविवारपासून (ता. २९) शिबिर सुरू होईल. गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश चव्हाण यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी अध्यक्षस्थानी असतील. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांची प्रमुख उपस्थिती आहे. निडसोशी मठाचे निजलिंगेश्वर महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप होईल. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी, राकेश पाटील यांची उपस्थिती आहे. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. संतोष बाबर, डॉ. नीलेश शेळके, डॉ. दत्तात्रय वाघमारे काम पहात आहेत. कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.