माजी सैनिकांसाठी आज गडहिंग्लजला फुटबॉल स्पर्धा

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील अर्जुन रिफायनरीज व एटी फौडेशनतर्फे उद्यापासून  (ता.२८) फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. संकेश्वर मार्गावरील म.दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या  मैदानावर या स्पर्धा होतील. उद्या माजी सैनिकांसाठी  स्पर्धा होणार आहे. गडहिंग्लजला प्रथमच माजी सैनिकांसाठी फुटबॉल स्पर्धा होत आहे. सकाळी अकराला स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे‌. सायंकाळी साडेचारला अंतिम सामना होईल. तर रविवारी (ता.२९) १७ वर्षांखालील मुलींसाठी  सिक्स-ए-साईड फुटबॉल स्पर्धा  होईल. फुटबॉलप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अंजू तुरंबेकर व उद्योजक संतोष शिंदे यांनी केले आहे.