साई एज्युकेशन सोसायटीला 'वनश्री' पुरस्कार प्रदान

KolhapurLive

कोल्हापूर : पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वनश्री पुरस्कार स्वीकारताना तुषार पाटील आणि अनंत पाटील,  यावेळी सीईओ संजयसिंह चव्हाण,  जिल्हा पोलीस  प्रमुख  डॉ. शैलेंद्र बलकवडे आदी. 
गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्याचा सामाजिक वनीकरण पुणे विभागात शैक्षणिक संस्थामध्ये वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण, संवर्धन, वनीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांच्या कल्याणार्थी , पर्यावरण, जलजागृतीबाबत उल्लेखनीय कार्याबद्दल येथील साई एज्युकेशन सोसायटी या संस्थेला 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. संस्थेचे संचालक तुषार पाटील, अनंत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल‌ रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेंद्र  बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयसिंह चव्हाण, वन अधिकारी डॉ. मधुकर चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्था अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेला दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.