गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रिएटिव्ह ब्रिलियंट ॲकॅडमी सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते झाले.अमित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसोबतच एनईईटी, जेईई, एमएचटी-सीईटी याचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून क्रिएटिव्ह ब्रिलियंट अकॅडमी सुरू केल्याचे श्री बेळगुद्री यांनी सांगितले. श्री कुलकर्णी म्हणाले, 'सतत प्रयत्नशील राहिल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. त्यामुळे यश मिळत नाही तोवर प्रयत्नशील रहा.' मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी स्वागत केले. पूजा घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. विनायक माने यांनी आभार मानले.