गडिंग्लज: राजकीय कार्यकर्त्यांवर धाडी टाकून चारित्र्यहणनाचा प्रयत्न होत आहे. त्याला जनता दलाचा विरोध असल्याचे सांगत जनता दलाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी कोणत्याही कार्यकर्त्यावर राजकीय हेतूने होणार कारवाई चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
माझी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीने धाडी टाकल्या. या अनुषंगाने माजी आमदार शिंदे बोलत होते. कोणत्याही राजकीय हेतूने कारवाई होत असल्यास चुकीचे आहे. राजकीय कार्यकर्त्यांना नामोहरण करण्याची मोहीम भाजप सरकारने चालवलीआहे. ती थांबवावी अशी मागणी केली आहे. अशी कारवाई निषेधाह असल्याचे ॲड. शिंदे यांनी यावेळी सांगितले.