गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) निवृत्त कर्मचाऱ्यांची रविवारी (ता.१५) बैठक होणार आहे. तेथील जागृती हायस्कूलशेजारील राम मंदिरात सकाळी दहाला बैठक होईल. विभागीय अध्यक्ष कमलाकर रोटे, विभागीय सचिव बाबासाहेब कोकणे उपस्थित राहणार आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन व अन्य प्रश्नासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.