भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका शुक्रवारी (२७ जानेवारी) सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना एमएस धोनी याचे होम ग्राउंड झारखंड स्टेट क्रिकेट असोसएशन मैदानावर खेळला जाणार आहे. सामना रात्री ७.३० मिनिटांनी सुरू होणार असून खेळपट्टी महत्वाची भूमिका पार पाडेल. हार्दिक पांड्या याला या टी२० मालिकेतन संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अशात पहिला सामना जिंकवून हार्दिक मालिकेची सुरुवात गोड करण्याच्या प्रयत्नात असेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी रांची येथे होणार आहे. या संघात नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे खेळाडू संघाचा भाग असणार नाहीत. मात्र, शुबमन गिलसोबत या सामन्यात सलामीवीर कोण असेल? आता भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. वास्तविक, त्याने रांची टी२० सामन्यात शुबमन गिलसोबत कोण ओपनिंग करेल हे सांगितले.
हार्दिक पांड्या म्हणाला की शुबमन गिलने चमकदार कामगिरी केली आहे. या खेळाडूला आजवर जितक्या संधी मिळाल्या आहेत, त्याचा फायदा त्याने घेतला आहे. भारतीय कर्णधाराने सांगितले की, शुबमन गिलने गेल्या 4 डावात ३ वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे. ज्यामध्ये द्विशतकाचा समावेश आहे. शुबमन गिलने हैदराबादमध्ये शानदार द्विशतक झळकावले. हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, “पृथ्वी शॉला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल, कारण शुबमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या वक्तव्यानंतर शुबमन गिलसोबत ईशान किशन हा दुसरा सलामीवीर असेल हे स्पष्ट झाले आहे.”
न्यूझीलंडविरुद्धच्या ३ टी२० मालिकेसाठी पृथ्वी शॉचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक, पृथ्वी शॉ बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा करत होता, पण त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती. पृथ्वी शॉची निवड न झाल्याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता पृथ्वी शॉला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत स्थान मिळाले आहे. पृथ्वी शॉ अखेरचा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये जुलै २०२१ मध्ये दिसला होता. मात्र, आता पृथ्वी शॉला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळाले असले तरी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनर किवी संघाचा कर्णधार असू शकतो. भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलत असताना, शिवम मावी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंग यांच्या रूपात अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील. त्याचवेळी किवी संघात मार्क चॅपमन आणि ईश सोधी देखील अॅक्शन करताना दिसू शकतात. याशिवाय बेन लिस्टर पदार्पण करू शकतो.
झारखंडची राजधानी रांची येथे बांधण्यात आलेल्या या क्रिकेट स्टेडियममध्ये नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते, जिथे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करायला आवडतात. खेळपट्टी गोलंदाजांना चांगली मदत करते, पण फलंदाजांनी सुरुवातीला चेंडू किती स्विंग होईल हे समजून खेळणे गरजेचे आहे, शेवटी दव किती प्रभाव पाडते हे देखील महत्वाचे लिस्टर
भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जितेश शर्मा, मुकेश कुमार , पृथ्वी शॉ
न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, हेन्री शिपले, बेन लिस्टर्