'शिवराज' मध्ये प्रबोधन कार्यक्रम

KolhapurLive



गडहिंग्लज, ता.२ : येथील शिवराज महाविद्यालयात नववर्ष स्वागतानिमित्त प्रबोधन  कार्यक्रम घेण्यात आला.  संस्थेचे सचिव‌ डॉ. अनिल  कुराडे यांनी  मार्गदर्शन  केले. 

 नववर्षाचे स्वागत चांगल्या संकल्पनेतून करण्याची गरज असून त्याला प्रबोधनाची झालर प्राप्त होणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त जीवन जगण्यासह  नववर्षाचे स्वागत प्रबोधनाच्या माध्यमातून करून आपली  संस्कृती जपली पाहिजे, असे डॉ. कुराडे यांनी  सांगितले.   अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस. कदम होते . स्वागत डॉ. आनंदा कुंभार यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. 

प्राचार्य डॉ. कदम यांनी  सर्वांना व्यसनमुक्तीच्या संकल्पाची  शपथ दिली. एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, एन. सी. सी कॅडेट, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

              ✳️ *कोल्हापूर LIVE* ✳️

*गडहिंग्लज-चंदगड-आजरा-राधानगरी-कागल तालुक्यातील बातम्यांसाठी आजच आमचा 9766784500 मोबाईल क्रमांक आपल्या whasapp ग्रुपवर ऍड करा*

*जाहिरात-सुर्या सांस्कृतिक भवन-शुभकार्य तुमचे,कार्यपूर्ती आमची !*


   ✳️ *सत्याचे प्रतिबिंब* ✳️