उत्तूरमध्ये संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेस प्रारंभ

KolhapurLive


उत्तूर , ता. २ : उत्तूर  (ता.आजरा) येथील  त्रिवेणी  सांस्कृतिक,  शैक्षणिक व क्रीडा  संस्थेतर्फे २३ व्या संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेला सुरुवात झाली. यानिमित्ताने पहिले पुष्प प्रा.रवींद्र कोकरे (फलटण) यांनी  ग्रामीण कथाकथनाने गुंफले. 

अध्यक्षस्थानी 'गोकुळ'चे  माजी अध्यक्ष रवींद्र आपटे होते.‌  प्रा. श्रीकांत नाईक यांनी स्वागत केले.   अजित उत्तूरकर यांनी  प्रास्ताविक केले.  प्रा. कोकरे यांनी जीवनात घडत असलेल्या छोट्या-छोट्या  गोष्टी विनोदी व  ग्रामीण शब्दात कथन करीत रसिक श्राेत्यांना मंत्रमुग्ध केले . नवनियुक्त सरपंच किरण आमणगी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात  आला.  या वेळी अध्यक्ष टी.के. पाटील, उद्योजक अनिल लोखंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सौरभ वांजोळे यांनी सूत्रसंचालन केले.  महेश करंबळी यांनी आभार मानल.

            ✳️ *कोल्हापूर LIVE* ✳️

*गडहिंग्लज-चंदगड-आजरा-राधानगरी-कागल तालुक्यातील बातम्यांसाठी आजच आमचा 9766784500 मोबाईल क्रमांक आपल्या whasapp ग्रुपवर ऍड करा*

*जाहिरात-सुर्या सांस्कृतिक भवन-शुभकार्य तुमचे,कार्यपूर्ती आमची !*


   ✳️  *सत्याचे प्रतिबिंब* ✳️