गडहिंग्लज : ता. बहिरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शमनजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमधील बहिरेवाडीच्या रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन केले.
यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीही साजरी केली.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या नामफलकाचे अनावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रियाज शमनजी,सचिव लक्ष्मण कंग्राळकर यांनी केले. श्री शमनजी, श्री.कंग्राळकर व विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले. एनएसएसच्या पुढील सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त सचिव सुलेचना पाटील, आरमान शमनजी, निलेश काग्राळकर, उपप्राचार्य श्री. माळी, श्री. कडपे आदी उपस्थित होते.