'अथणी शुगर्स' ची ऊस बिले जमा

KolhapurLive

कडगाव, ता. १२  : अथणी शुगर्स, भुदरगड युनिट साखर कारखान्याने १६  ते ३१ डिसेंबरपर्यंतची एकरकमी प्रतिटन रु. ३००० प्रमाणे ऊस बिले उत्पादकांच्या बँक  खात्यावर जमा  केल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर  श्रीनिवास पाटील यांनी दिली.

तोडणी वाहतुकीची बिलेही जमा केली. चालू हंगामात साखरेचा भाव चढ-उतार होत असूनही पंधरवड्याची बिले वेळेवर दिली आहेत. चालू हंगामात ७५  दिवसात २ लाख ४२ हजार  ७८२  टन ऊस गाळप केला. असे गाळप करून ११.८९ उतारा असून  २ लाख  ९७ हजार ८४५ क्विंटलसाखर उत्पादित झाली आहे.  शेतकऱ्यांनी ऊस  कारखान्याकडे गाळपासाठी  पाठवावा, असे आवाहन पाटील  यांनी केले. यावेळी‌ चिफ  इंजिनिअर  सुरेश शिंगटे,  डे चिफ केमिस्ट पी. बी. हेदुरे , मुख्य शेती अधिकारी एल. बी.देसाई, कार्यालय अधीक्षक  बाबासाहेब देसाई, डे . चिफ अकौंटंट जमीर मकानदार , लेबर ऑफिसर  कन्हैया गोरे उपस्थित होते.