नेसरी : येथील शिक्षण समिती कसबा नेसरीच्या सचिव डॉ. अर्चना हेमंत कोलेकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सिनेट सदस्यपदी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यामार्फत शिक्षकेतर सेवकांमधून नियुक्ती झाली, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी दिली. डॉ. कोलेकर तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मुख्य लिपिक म्हणून २३ वर्षापासून कार्यरत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संस्थाअध्यक्ष ॲड. हेमंत कोलेकर यांच्या त्या पत्नी आहेत.