गडहिंग्लज :संकेश्वर -बांदा या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या रस्त्याच्या कडेची झाडे तोडताना फांदी पडून रामा फुटाणे (रा. हसुरचंपू ) हे मयत झाले तर प्रकाश सनापगोळ (रा. बेनकोळी) हा झाड सोडणारा कामगारही जखमी झाला आहे. या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केले आहे. उपविभागीय अधिकारी यांना शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्यान्नावर तम्माना पाटील,दशरथ दळवी, आप्पासो जाधव, अण्णासाहेब पाटील, फुलाजी खैरे, रामचंद्र गवळी वीरूपाक्ष कुंभार, उमेश चिंचनेकर यांच्यासह इतरांनी निवेदन दिले आहे. शिरस्तेदार जीवन क्षीरसागर यांनी सदर निवेदन स्वीकारले. या मयत प्रकरणी संबंधित सर्व घटकवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली असून यासाठी आठ दिवसात तातडीने बैठक बोलवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदितातून दिला आहे.