मजरे जट्टेवाडीच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

KolhapurLive
चंदगड, ता. मजरे जट्टेवाडी  (ता. चंदगड) येथील शाळकळी मुलाचा दड्डी (जि. बेळगाव) गावच्या हद्दीत घटप्रभा नदीत बुडून मृत्यू झाला. आर्यन संतोष पाटील (वय 14)असे त्याचे नाव आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली.
        याबाबत अधिक माहिती अशी, मजरे जठ्ठेवाडी येथील ग्रामस्थ दरवर्षी कोट (ता. हुकेरी जि. बेळगाव) येथील यल्लमा देवीच्या यात्रेला जातात आर्यन कुटुंबासह सोबत या यात्रेला गेला होता. यात्रा करून परत येत असताना दड्डी येथे घटप्रभा नदीच्या संगमावर धार्मिक विधी केली जातात सर्वजण या कामात गुंतलेले असताना आर्यन व त्याचे मित्र नदीत पोहण्यासाठी उतरले नदीत उडी मारली. त्यानंतर बराच वेळ तो वर आला नाही त्याच्याबरोबर असलेली इतर मुलांनी हा प्रकार ग्रामस्थांना येऊन सांगितलं. नंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तो बागिलगे -डुक्करवाडी विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता.त्याच्यामागे आई-वडील व लहान भाऊ आहे.