औरनाळच्या पार्वती हायस्कूलमध्ये आरोग्यवर व्याख्यान

KolhapurLive

गडिंग्लज : औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये जनस्वास्थ दक्षता समिती, कोल्हापूर,जिल्हा मुख्यध्यापक संघ त्यांच्या विद्यमाने 'जनस्वास्थ अभियान' राबविले जात आहे.याचाच भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कडगावचे आरोग्य निरीक्षक अशोक निकम यांनी कुष्ठरोग, क्षयरोग,डेंग्यू, एड्स, मलेरिया,मधुमेह, त्वचारोग,कॅन्सर आधी आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्यापासून कसे दूर राहावे याचे मार्गदर्शन केले. डॉ. अरुण तोडकर यांनी किशोरवायन मुलांनी घ्यावयाची दक्षता याविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे होते. प्रस्ताविक यु.पी. सावंत यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य सेवक आर. ए. मुजावर, आरोग्य सेविका के. एस. करजगे, एस. एम.कोळी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. आभार बी. जी. कुंभार यांनी मानले.