महामार्ग बाधितांचे आजपासून आंदोलन

KolhapurLive

गडहिंग्लज : संकेश्वर- बांदा  महामार्गबाधित शेतकरी संघटनेतर्फे बुधवार  (ता. २५) पासून  बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे. प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे ९ जानेवारीला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. 

पण, प्रांताअधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.  बैठकीचे इतिवृत्त देण्याचे व रस्त्याची मोजणी करण्याचे आश्वासन  संघटनेला दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित केले होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नसल्याने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, संजय तर्डकर यांनी प्रसिद्दीस दिले आहे.