शिवराज फार्मसीमध्ये 'स्पंदन' कार्यक्रम संपन्न

KolhapurLive
गडहिंग्लज : येथील शिवराज फार्मसी कॉलेजमध्ये स्पंदन २ के २३ कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे उपस्थित होते.

     स्वागत व प्रस्ताविक प्रा. डॉ. राहुल जाधव यांनी केले. सुरुवातीला फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले अध्यक्ष प्रा. किसन कुराडे यांनी भारतीय वैद्यकीय जगात फार महत्त्व आहे. प्राचीन ऋषीमुनींनी या क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे.असे सांगितले. सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी वैद्यकीय शिक्षण व ज्ञान त्या अनुषंगाने परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम आम्ही करू. समाजचे आरोग्य बिघडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत,असे सांगितले  उपाध्यक्ष ॲड. कुराडे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.प्राचार्य डॉ. जाधव यांनीही मार्गदर्शन करताना महाविद्यालयातून फार्मसीचे अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही सर्वतोपारी प्रयत्न करू असे सांगितले. सूत्रसंचालन वैष्णवी पाडले हिने केले, तर आभार श्रावणी कुंभार यांनी मानले.          कार्यक्रमाला नाईट कॉलेज कोल्हापूरचे प्रा. महेंद्रकुमार जाधव ,संचालक आर.एच. पाटील यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय सेवक, विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होत्या.