गडहिंग्लज : दक्षिण कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना जेईई, नेट, सीईटी परीक्षेसाठी संजीवनी ठरलेल्या सुपर अभिनव अकॅडमी मार्फत नवनवीन उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आलेल्या गुणवत्तेला योग्य न्याय देण्याचे काम केले जाते. याचाच एक भाग म्हणून अकॅडमीने दहावीतील विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट स्कॉलरशिप परीक्षा आयोजीत केली होती. यामध्ये आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातून जवळपास २०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या फीमध्ये सवलत देण्यात आली. परीक्षानंतर झालेल्या करिअर मार्गदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रमात विद्या प्रबोधन सांगलीचे प्राचार्य संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.अकॅडमीच्या संचालक एस.बी.पाटील व अमोल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. बारवेलकर यांनी पालकांच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व उपस्थितांचे आभार मानले.