मुगळीतील अपघातात आई ठार तर मुलगा जखमी

KolhapurLive


नूल : मुगळीजवळील श्रीनगर वसाहतीच्या रस्त्यावर झालेल्या दुचाकी आणि एसटी बसच्या अपघातात बेबीताई राजाराम पाटील (वय ५८, रा. नूल) या ठार झाल्या. तर मुलगा महेश राजाराम पाटील हा जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता झालेल्या अपघाताची  नोंद गडहिंग्लज पोलीसात झाली आहे. 

 याबाबतची माहिती अशी, महेश आणि त्यांची आई बेबीताई हे नूल  येथून दुचाकिवरुन  गडहिंग्लजला डोळ्याच्या उपचारासाठी मुगळीमार्गे जात होते. मुगळी गांवच्या हद्दीतील श्रीनगर वसाहतीजवळ रस्त्याच्या वळणावर गडहिंग्लज आगाराच्या गडहिंग्लज ते नुल बसची आणि दुचाकीची धडक झाली.  यातच दुचाकीवरील बेबीताई खाली पडून गंभीर जखमी झाल्या, तर महेशही जखमी झाला तातडीने उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यातात आले . येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेबीताई पाटील यांना मृत घोषित केले तर महेशवर उपचार सुरु आहेत . त्यांच्या निधनाची माहिती समजताच  गावात हळहळ व्यक्त होत आहे. बेबिताई यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे, सासूबाई असा परिवार आहे.