गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवला सुरुवात झाली. उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते झाले यावेळी सचिव अण्णासाहेब बेळगुंदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योतीची प्रतिष्ठापना केली. स्पर्धेचे नियोजक मुख्याध्यापक दिनकर रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब सुतार,पुंडलिक मोहनगेकर, सचिन पोवार यांच्यासह शिक्षण व कर्मचाऱ्यांनी केले. प्रस्तावित व्हिक्टोरिया मस्का हेन्स यांनी केले, तर आभार आण्णासो घेवडे यांनी मानले. स्नेहा पारधे यांनी सूत्रसंचालन केले.