आजरा, ता.५ : खानापूर (ता. आजरा ) येथे टस्कराने चांगलाच धुडगूस घातला आहे. शेतामध्ये ठेवलेल्या पिण्यासाठीच्या टाक्यांना ते लक्ष करत आहेत ते पाण्यांच्या टाकीनचा चेंडू सारखे पायाने खेळत फोडत टाकत आहे खानापुरात त्यांनी तीन पाण्याची टाकी फोडून टाकल्यावर ऊस पिकाची नुकसान केले आहे त्यांच्या या कृत्यामुळे शेतकरी चिंतेत आहे
खानापूर परिसरात टस्कर वावरत आहे.दोन दिवसांपूर्वी त्यांनी रायवाड्यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटी केली . खानापूर गावातील शिवारात बुधवारी (ता.४) त्याने संजय गोपाळ सावंत यांच्या दोन पाण्याच्या टाक्या फोडल्या. उत्तम सडोलकर यांची पाण्याची टाकी खेळवत अंदाजे एक किलोमीटर अंतरावर नेऊन टाकली. याच गावातील विठोबा गुरव, सदानंद गुरव,तुकाराम गुरव व अजिंक्य गुरव यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे. या शेतकऱ्यांचे सुमोर पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. वनपाल संजय नीलकंठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानाची पाहणी केली व नुकसानाचा पंचनामा केला आहे.या परिसरातून टस्करला हुसकावून लावावे,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
✳️ *कोल्हापूर LIVE* ✳️
*गडहिंग्लज-चंदगड-आजरा-राधानगरी-कागल तालुक्यातील बातम्यांसाठी आजच आमचा 9766784500 मोबाईल क्रमांक आपल्या whasapp ग्रुपवर ऍड करा*
*जाहिरात-सुर्या सांस्कृतिक भवन-शुभकार्य तुमचे,कार्यपूर्ती आमची !*
*केक & डोनट-अल्पवधीतच सर्वांच्या पसंदीस आलेले केक व इतर बेकरीचे दालन*
✳️ *सत्याचे प्रतिबिंब* ✳️