चंदगड, ता. ५ : चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रविवारी ( ता.८) नागरी सत्कार होणार आहे. हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीत या निमित्ताने शेतकरी मेळावा होणार आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कारीही होणार आहे. आमदार राजेश पाटील यांनी ही माहिती दिली.
महाविकास आघाडीच्या कालावधीत त्यांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघ विकासासाठी साडेतीनशे कोटीचा निधी मिळाला. आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश टोपे,आमदार जयंत पाटील यांचे सहकार्य लाभले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आश्वासन दिले होते .मात्र कोरोनामुळे विलंब झाला. तरीही दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांची अनुदान गेल्या मार्चच्या अर्थसंकल्पनात समाविष्ट केला.तीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. पवार यांनी यापूर्वीही तालुक्याच्या विकासाला हातभार लावला आहे.पाटबंधारे प्रकल्पामुळे तालुक्यात १६ टन ऊस उत्पादन होत आहे . याचेच औचित्य साधून त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यचा सत्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी केले आहे.
✳️ *कोल्हापूर LIVE* ✳️
*गडहिंग्लज-चंदगड-आजरा-राधानगरी-कागल तालुक्यातील बातम्यांसाठी आजच आमचा 9766784500 मोबाईल क्रमांक आपल्या whasapp ग्रुपवर ऍड करा*
*जाहिरात-सुर्या सांस्कृतिक भवन-शुभकार्य तुमचे,कार्यपूर्ती आमची !*
*केक & डोनट-अल्पवधीतच सर्वांच्या पसंदीस आलेले केक व इतर बेकरीचे दालन*
✳️ *सत्याचे प्रतिबिंब* ✳️