गडहिंग्लजला उद्यापासून भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन

KolhapurLive


गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथे ७ ते १० जानेवारी दरम्यान पुन्हा एकदा भव्य असे संजवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे कृषि प्रदर्शन मुलींच्या हायस्कूल शेजारी असणाऱ्या  खुल्या मैदानावर  भरणार आहे.

यावेळी कोल्हापूर लाईव्ह सोबत बोलताना राज डवरी म्हणाले  की गडहिंग्लज उपविभाग हा  शेतीप्रधान व शेतीपूरक व्यवसायासाठी अनुकूलन आहे. त्यामुळे दर दिवशी होत असलेले आधुनिकीकरण व नवनवीन  झालेले बदल शेतकऱ्यांना समजावेत व शेतकऱ्यांचे खऱ्याआर्थी  आर्थिक सक्षमीकरण व्हावे हा उद्देश  नजरेसमोर ठेवून दरवर्षी संजवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजना केले  जाते.  यंदाच्या वर्षी देखील गडहिंग्लजमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ७ ते १० जानेवारी  यावेळेत  भरविण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनामध्ये आधुनिक माहिती व तंत्रज्ञान देणारे शेतीपूरक स्टॉल व इतरही स्टॉल उपलब्ध असणार आहेत.  गडहिंग्लज विभागातील शेतकरी  व नागरिकांनी सदरच्या  राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे अवाहन राज डवरी यांनी  कोल्हापूर लाईव्ह च्या माध्यमातून केले आहे.