गडहिंग्लज : दुंडगे गावच्या हद्दीतील सुपर कोल्ड्रींक्ससमोर शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास उघड्यावर देशी दारू विक्री करताना जितेंद्र दयाप्पा सूर्यवंशी (वय ५०, रा.कडलगे) यांच्यावर गडहिंग्लज पोलिसांनी कारवाई केली आहे. याची फिर्यादी दादू नारायण खोत यांनी दिली असून गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अंगझडतीत १ हजार २६० रूपयाचा सिलबंद १८ देशी दारू बाटल्या जप्त केल्या आहेत. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पाटील करत आहेत.