महागाव : येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यानी शिवाजी विद्यापीठामार्फत मे २०२२ मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान पटकावले .
यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील गुणवत्ता यादीत अनिता मोरे प्रथम , पुनम कोकितकर पाचवी, मेकॅनिकलमध्ये सायली मांडे दहावी, इलेक्ट्रिककलमध्ये आकांक्षा देसाई प्रथम, सुप्रिया शिंगटे दुसरी, मोनिका पाटील तिसरी , आरती आर्दाळकर चौथी, शिल्पाज्ञा मोरे पाचवी , अंकुर भोसले सातवा , विशाल पाटील , आठवा हाफिजा शेखने नववा क्रमांक पटकावित गुणवत्ता यादी स्थान मिळवले . सर्व यशस्वी विद्यार्थ्याना प्राचार्या डॉ. एस. एच. सावंत प्रा. एस. टी. माटले, प्रा. ए. बी. फराक्टे प्रा. विनायक घाटगे , डॉ . विरेश मठद यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.