दौलत -अथर्वचा वजनकाटा पारदर्शी

KolhapurLive

चंदगड, ता. हलकर्णी (ता. चंदगड) येथेल दौलत-अथर्व कारखान्याचा वजनकाटा पारदर्शी असल्याचा अहवाल वजन काटा तपासणी करणाऱ्या भरारी पथकांकडून देणे देण्यात आला. या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारखान्यावर येऊन वजनकाट्याची तपासणी केली. बैलगाड्या व इतर वाहने काठ्यावर उभी करून त्याचे वजन घेतले. वजन मापे निरीक्षक एम.बी. पाटील यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्ड्यांवर, मंडळ अधिकारी अरुण शेट्टी, लेखापरीक्षक बि.डी. खाडे,पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांचा पथकात समावेश होता.वजनकाटा पारदर्शी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. युनिक हेड ए.आर. पाटील, सचिव विजय मराठी, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवणे, शेती अधिकारी युवराज पाटील,अश्रू लाड, पी.डी. सरवदे, अमर काकडे उपस्थित होते.