रोटरी क्लबच्यावतीने विद्या प्रसारक मंडळास कपाटे भेट

KolhapurLive


गडहिंग्लज : रोटरी क्लब शाखा अतिग्रे यांच्यावतीने येथील विद्या प्रसारक मंडळास ग्रंथालय व प्रशासकीय कामासाठी चौदा कपाटांची भेट दिली . समाजाेपयाेगी उपक्रमाअंतर्गत ही कपाटे भेट देण्यात आली. रोटरी क्लबमार्फत वैचारिक , जागृती , शैक्षणिक व सामाजिक संस्थांना पायाभूत विकासांतर्गत भेट दिली जाते.  याअंतर्गत विद्या प्रसारक मंडळास कपाटे दिल्याचे कोल्हापूर जिल्हा इंटरनॅशनल रोटरी क्लबचे गव्हर्नर  व्यंकटेश देशपांडे यांनी सांगितले. यावेळी  रोटरियन असि. गव्हर्नर प्राचार्य  डॉ. प्रशांत कांबळे , रोटरियन डॉ.  हिंदुराव संकपाळ आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष रत्नमाला घाली, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी , अरविंद कित्तूरकर, बी. जी. भोसकी, महेश घाळी, किशोर हंजी , प्राचार्य डॉ.  मंगलकुमार पाटील  यांनी  क्लबचे कौतुक केले.  यावेळी प्राचार्य डॉ. संभाजी भांबर, प्रा.  अनिल उंदरे, विजय चौगुले , विलास शिंदे, डॉ. नागेश मासाळ उपस्थिति होते. आभार ‌डॉ. दत्ता पाटिल यांनी मानले.