आजरा : येथील आजरा हायस्कूलमध्ये शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा झाल्या. आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी येसणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले . हनुमानची प्रतिमा व मॅटचे पूजन झाले. कुस्ती विभागाचे प्रमुख एस .एस. मर्दाने यांनी कुस्तीच्या नियमाची माहिती सांगितली.या स्पर्धेचे नऊ वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक व दहा वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी पटकावला.
यशस्वी खेळाडूंची करवीर खेबवडे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुख्याध्यापक श्री. येसणे, उपमुख्यद्यापक बी. एम. दरी, पर्यवेक्षक श्री. होलम यांचे प्रोत्साहन मिळाले. कुस्ती विभाग प्रमुख एस. एस . मर्दाने, सी . जी. गोरे , ए. एस. नाईक, सौ. एम.पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.