चंदगड : माजी सैनिकांना शासनाने देऊ केलेल्या जमिनीचा कब्जा गेल्या 40 वर्षापासून अद्याप दिला नाही . तो तातडीने न दिल्यास दि. ९ डिसेंबर पासून चंदगड तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करणार इशारा वीर पत्नी शोभा पाटील यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी तहसीलदार विनोद रणवरे यांना निवेदन दिले . वीर पत्नी शोभा शिवाजी पाटील या कै. हवलदार शिवाजी कृष्णा पाटील (कीर्ती चक्र विजेते ) यांच्या पत्नी आहे त्यांचे पती १९८६ साली राजस्थान कोठा येथे देश सेवा बजावत असताना हुतात्मा झाले .
यासाठी सरकारकडून मरणोत्तर कीर्ती चक्र व महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला. पतीच्या हयातीत दि .२६ जून १९७६ सिलीगमधून जमीन मिळाली आहे. प्रत्यक्ष कब्जा मिळवण्यासाठी गेली ४० वर्ष सैनिकांना संघर्ष करावा लागत आहे .याचा लाभ पुढील पिढीला मिळावा, वारंवार निवेदन देऊनही कामात प्रगती दिसत नाही. वरील काम येत्या आठ दिवस न झाल्यास वचित माजी सैनिक अन्य त्याग सत्याग्रह करणार इशारा शोभा पाटील सैनिक फेडरेशनचे जिल्हा संघटक कुमार पाटील माजी सैनिक संजय जाधव, रणजीत गावडे ,दशरथ पाटील, राजाराम फडके ,सुरेश दळवी ,यशवंत धावसकर, चंद्रकांत गावस, मोहन पाटील ,विठ्ठल गावडे, सुरेश मेटकुपी, सचिन सावंत यांनी दिला आहे.