कर्पेवाडीचा समावेश आजरा नगरपंचायत हद्दीत करावा

KolhapurLive


       नागरिक नगरपंचायतीतील मतदान करतात पण या गावचा नगरपंचायतीच्या शहरविकास आराखड्यामध्ये समावेश नाही समावेश नाही शहरालगत असलेल्या कर्पेवाडीत  गावचा आजरा नगरपंचायतीमध्ये समावेश करून घ्यावा, अशी मागणी गुरुवारी झालेल्या नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवक आनंदराव कुंभार यांनी केली याबाबतचा ठराविही घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ज्योत्स्नात चराटी होत्या.
 
      नगरसेवक कुंभार म्हणाले,  गावच्या समावेश या आराखड्यात नाही. कर्पेवाडीचे  २३६ नंबरचे क्षेत्र वगळण्यात आले आहे याबाबत अनेकदा महसूल प्रशासनाने आदेश दिले आहेत. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही या गावातील रहिवाशी मतदार करीत आहेत. यांचा नगरपंचायतीमध्ये समावेश करून घ्यावा अशी सूचना मांडली. ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराठी यांनी याला अनुमती देत याबाबत ठराव मांडला .

     यावेळी चराटी म्हणाले ,अवजड वाहनांसाठी शहराच्या बाहेरून वळण रस्ता करावा अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत. नगरपंचायतीने यामध्ये लक्ष घालावे , अशी मागणी होत आहे . याबाबत चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आला आठवडा बाजाराचा लिलाव ४ लाख ४० हजार रुपयांना दिल्याचे सभागृहात सांगण्यात आले . अधिकारी व कर्मचारी यांना सनुग्रह अनुदान द्यावे व स्वच्छता अभियानासाठी शहर समन्वयक नेमण्याबाबतची चर्चा झाली. शहरा विविध ठिकाणी हायमॅक्स दिवे लावण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगताच आधी शहरात बंद असलेले हाय मॅक्सचे दिवे सुरू करा मग दिवे लावा अशी सूचना नगरसेवक संभाजी पाटील यांनी केली येते काही दिवस शहर अग्निशमनची गाडी उपलब्ध होणार असून नगरपंचायतीकडे असलेल्या गाड्यांसाठी शेड उभा करण्याची सूचना चराटी यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष स्मिता जाधव , नगरसेवक किरण कांबळे यांनी सूचना मांडल्या.

        यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक सिकंदर दरवाजकर , शुभदा जोशी , शकुंतला सलामवाडी अनिरुद्ध केसरकर , रेश्मा सोनेखान , यासिराबी लामतुरे सुमय्या खेडेकर, यास्मिन बुढ्ढेखान, यांनी चर्चात सहभाग घेतला प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली वरिष्ठ कारखून संजय जाधव यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले . या सभेदरम्यान प्रशिक्षणार्थ जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी नगरपंचायतीला भेट दिली. सभेला उपस्थित राहून माहिती घेतली तशिलदार विकास अहिर यावेळी उपस्थित होते.