उद्यापासून घाळी चषक लीग

KolhapurLive


शालेय फुटबॉलर ; १४,१७ वयोगटाच्या खेळाडूंना पर्वणी 

 गडहिंग्लज , ता. १ :  येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता.३)  माजी खेळाडू डॉ. घाळी लिग शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे .चौदा आणि  सतरा वर्षाखालील गटात होणारी ही स्पर्धा साखळी पद्धतीने होणार आहे. दर शनिवारी आणि रविवारी  दुपारच्या सत्रात  म. दु. श्रेष्ठी  
विद्यालयाच्या मैदानावर  हे सामने होतील पहिल्या टप्प्यात सतरा आणि दुसऱ्यात चौदा वर्षाखालील स्पर्धा होणार आहे.

      उपांत्य फेरीतील आठही संघांना स्पर्धेनंतर होणाऱ्या युनायटेड आंतरराज्य शालेय स्पर्धेत बेळगाव, कोल्हापूर, मिरज या संघाबरोबर खेळण्याची संधी मिळेल. सतरा गटाचे स्पर्धा  ८ ए साईड तर चौदाची नाईन साईड  पद्धतीने होईल.  स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघांना प्रतिष्ठेच्या डॉ. घाळी   करंडकासाठी क्रीडा साहित्य दिले जाणार आहे.‌ शनिवारी दुपारी १ वाजता स्पर्धेचे उद्घघाटन होणार असल्याचे युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांनी माहिती दिली.