उत्तुर : येथील पार्वती शंकर विद्यालय व मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज, आजरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १९ वे बालवैज्ञानिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान दिंडी, आकाशदर्शन संमेलन उद्घाटन, प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्रदान, बीजभाषण प्रयोग दिग्दर्शन, विज्ञान गप्पा, पक्षी निरीक्षण, विविध दालन भेट, वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण, पारितोषिक वितरण व संमेलन समारोप अशा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमाला डॉ.एस. एन. सपली, व्यंकटेश गंभीर, प्रा.जे.बी.बारदेस्कर, बी.जी. काटे, प्रा. के. एस. पुजारी, डॉ. किरण पोतदार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात परिसरातील सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष विश्वनाथ करंबळी यांनी केली आहे.