आजरा :वारणानगर येथे झालेल्या शासकीय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील खेळाडूंना यश मिळवले. कुणाल वाघ याने १५०० मीटर धावणेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर त्याने क्रॉस कंट्रीमध्ये ६ किलोमीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या रिले संघाने ४ बाय १०० व ४ बाय ४०० मीटर धावण्यामध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये सानिका खोत, समृद्धी सुतार खुशनुमसा आगलावे, मनीषा कांबळे शिवानी निऊगरे, सरिता गावडे व साक्षी पाटील यांचा समावेश आहे. मुलींच्या ४ बाय १०० धावांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या संघात हर्ष चौगुले, सिद्धार्थ कांबळे प्रथमेश गिरी, श्रेयश चिमणे व गौतम सुतार यांनी भाग घेतला. यामध्ये कुणाल वाघ यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी उपाध्यक्ष विलास नाईक, संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज देसाई कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडाशिक्षक प्रा. अल्बर्ट फर्नांडिस व प्रा. डॉ. डी.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.