दाटे येथे २८ पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

KolhapurLive


चंदगड : दाटे येथे ३७ वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बुधवार दि.२८ डिसेंबर ते मंगळवार दि.३ जानेवारी  २०२३ अखेर होणार आहे. सोहळ्यादरम्यान रोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन, हरिपाठ,  प्रवचन, कीर्तने असे विविध  धार्मिक  कार्यक्रम आहेत. हरिपाठ सेवेसाठी दाटे, बेळेभाट, हलकर्णी, धुमडेवाडी , कोरज,  तावरेवाडी, बागिलगे, प्रवचन सेवेसाठी ह.भ‌.प‌. बाळू भक्तीकर, नंदू गावडे, उमेश पावसे, यल्लाप्पा पाटील,  राणबा गावडे, हणमंत मिसाळ, कीर्तन सेवेसाठी ह.भ.प. नामदेव गरल, राजेद्रजी मोरे, भाऊसाहेब पाटील, संतोष सहरवबुद्धे, राजेंद्रजी दहीभाते, मोहनकाका पाटील यांचे व निवृत्ती मुंचलीकर  यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर  महाप्रसादाने सांगता होणार आहे. या कार्यक्रमास आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, राहुल गावडे, कलाप्पाणा भोगण उपस्थित रहाणार आहेत‌.  जाय्याप्पा वर्पे ,नारायण कुबल , अनंत पाटील, अंकुंश गवस, रामू मोरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी  उपस्थिति राहून श्रवणसुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारायण‌ मंडळ दाटे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.