कागल : कागल सातारापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करताना रस्ता रुंदीकरण, ठिकठिकाणी उड्डाणपूल ,विद्युतीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन, भूसंपादन ,जमिनीचा मोबदला तसेच या कामातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये भेट घेऊ, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली . या संदर्भातील लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची बैठक कागल विश्रामगृहात झाली. आमदार मुश्रीफ म्हणाले ,कागल बस स्थानकाजवळच्या भुयारी पुलाचे रुंदीकरण झाले पाहिजे. मुरगूडकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर उड्डाणपूल आवश्यक असून लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपुलासह पंचतारांकित एमआयडीसीकडे जाणारा रस्ता सुरळीत झाला पाहिजे.' यावेळी केडीसी चे संचालक भैया माने ,प्रकल्प संचालक व्ही . डी . पंदरकर, सर्वेअर आर .डी. काटकर, सोहम भंडारी ,मुख्यअधिकारी श्रीराम पवार ,बाळासाहेब नाईक, संजय ठाणेकर , अडव्होकेट संग्राम गुरव आदी प्रमुख उपस्थित होते.