महागाव : महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या निबंध स्पर्धेत मोठ्या गटात महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी अथर्व अर्जुन दिवटे हिने प्रथम क्रमांक व विपुल चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस.पाटील,संस्था प्रतिनिधी डी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.