गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे १० वर्षाखालील मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील मुलांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णालयात २० डिसेंबरपासून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत १० वर्षाखालील मुलांच्या हृदयाची तपासणी केली जाणार आहे. शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या मुलांवर मुंबई येथील नामवंत रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जाणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केदारी रेडेकर संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी केले आहे .