आजरा, ता. २७ : येथील रामतीर्थ हे पवित्र क्षेत्र आहे. असे असताना येथे जाणीवपूर्वक अनुचित प्रकार केले जातात. महिलांशी अश्लील चाळे केले जातात. हे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व बजरंग दल यांच्यातर्फे केली आहे. याबाबतीचे निवेदन तहसीलदार सहाय्यक पोलीस निरीक्षणांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामतीर्थ या पवित्र क्षेत्रावर अनुचित प्रकार घडत आहेत. याचा हिंदू नागरिकांना त्रास होत आहे. येथे अन्न धर्मयाकडून धार्मिक प्रकार, तरुण-तरुणींची लूटमार करणे, मांसाहार जेवण करून पार्टी करणे, मासेमारी करणे मध्यप्रशासन करणे याच्याबरोबर अश्लील चाळे करणे, दमदाटी करणे असे प्रकार सुरू आहेत. या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या प्रकारामुळे ते नाराज होऊन निघून जातात. याचा फटका व्यवसायिकांना बसत असून, आजऱ्याचे नाव खराब होत आहे. सदरचा प्रकार स्थानिक रहिवाशांनी सांगूनही असे प्रकार वारंवार होत आहेत. यावर वचक बसवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित लोकांवर तत्काळ कारवाई करावी. निवेदनावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बजरंग दल व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल व आनंद घंटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.