चंदगड मध्ये माडखोलकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर

KolhapurLive


चंदगड : येथील माडखोलकर महाविद्यालयात एनएसएस विभाग, ब्लड बँक च्या विद्यमाने स्व .र .भा. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी.आर पाटील यांनी केले. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

     स्वागत डॉक्टर संजय पाटील यांनी केले प्रमुख अतिथी चंद्रकांत पोतदार यांनी मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब (आरआरसी) यांच्यावतीने जागतिक एड्स दिन संपन्न केला. यावेळी विविध उपक्रम व रॅलीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून एड्समुक्त महाराष्ट्र, स्वप्न नव्हे ध्येय या ब्रीदखाली एड्स सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालय चंदगड पंचायत आणि नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

       यावेळी डॉ .एस . पी . बांदिवडेकर एम एम तुपारे, ऍडव्होकेट . आर .पी .बांधवडेकर गोपाल बोकडे, एस. व्ही . गुरबे  डी .एस .कदम प्रा. एस .के .सावंत, शरद हदगल डॉ.  एस . एस .सावंत डॉ. एस. एम .माने विनायक मेणके , बसवराज बेन्नी, अमेय सबनीस, विठ्ठल पाटील श्रीपाद सामंत उपस्थित होते.

    शिबिरासाठी प्रा. संजय पाटील प्रा. व्ही .के .गावडे डॉ. एस .डी .गावडे डॉ. एन .के .पाटील प्रा. आर. एस. पाटील प्रा. ए .डी .कांबळे एस .बी. हसुरे, प्रल्हाद कांबळे, विक्रम कांबळे, प्रमिला पाटील यांनी परिश्रम घेतले आभार  डॉक्टर एन के पाटील यांनी मानले.