गडहिंग्लज :येथील केदारी रेडेकर पब्लिक स्कूलमध्ये सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी नेतृत्व विकास शिबिर झाले.एएफसी च्या प्रशिक्षिका प्रमुख अंजना तुरंबेकर यांनी मार्गदर्शन केले.मुलींनी सकारात्मक राहून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन तुरंबेकर यांनी केले. यावेळी तुरंबेकर यांनी मुलींकडून प्रात्यक्षिक करून घेतली. स्कूलच्या व्यवस्थापिका स्नेहल रेडेकर, मुख्याध्यापिका अलका साळुंखे, शिक्षक उपस्थित होते. अंजना तुरंबेकर यांचा सत्कार रेडेकर संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते झाला. संस्थाध्यक्ष श्रीमती अंजना रेडेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. क्रीडा शिक्षक इम्रान बंधार यांनी आभार मानले.