गडहिंग्लज : येथील जिल्हा परिषदेचे महाराणी राधाबाई (एमआर) हायस्कूल पुढील महिन्यात १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या शतकमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हजारो विध्यार्थ्यांना घडविणाऱ्या ता प्रशालेची इमारत हेरिटेज म्हणून जाहीर झाली . या विभागातील 'शिक्षणाची जननी' म्हणूनच या प्रशालेची ओळख आहे. या प्रशालेचा शतकमहोत्सव दिमाखात करण्याचा निर्णय माजी विद्यार्थिनी घेतला .त्यासाठी शनिवारी ( ता.२४) सकाळी आठला शतकमहोत्सव प्री रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर माजी विद्यार्थ्यांची बैठक होईल. माजी विद्यार्थ्यांनी रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी मंडळाने केले आहे.