संकेश्वर - बांदा रस्ता जमिनीची मोजणी करा

KolhapurLive


शेतकरी संघटनेचे मागणी ; अभियंत्यांना निवेदन 
आजरा, ता. ७ : संकेश्वर - बांदा रस्त्याची वळण काढून रस्ता सरळ करण्यासाठी  लागणाऱ्या  जमिनीच्या गट क्रमांकाची यादी  गावचावडीवर लावली जात आहे ;  पण यापूर्वी रस्ता जेथून गेला आहे , पण तो कधीही संपादन झालेला नाही अगर कोणत्याही  प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना  दिसलेला नाही‌. त्या बाधित शेतकऱ्यांची  सरसकट जमीन मोजून संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग  क्रमांकाची - २ कोल्हापूरचे  उपअभियंता  यांनी दिली आहे.
      शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आपण सर्वोच्च न्यायालयाचा १९९५ च्या  निर्णयाबाबत भीती घालून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून  होते आहे. सध्या रस्ता  दुपदरी होणार‌ असल्याचे सांगितले जात आहे, पण रस्ता पंधरा मीटर रुंदीने होणार आहे. म्हणजे किमान ४५  फूट रुंदीने रस्त्याचे काम होणार आहे,  पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार रस्ता काही ठिकाणी ३.७५ मीटर तर काही ठिकाणी  ५.५० मीटरने आहे. सध्याच्या काम होणाऱ्या  रस्त्याइतकी वहीवाट शासनाची दिसत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांची  वहीवाट असल्याचे स्पष्ट  होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाच गैरवापर प्रशासनाने करू नये, असे निवेदनादत  म्हटले आहे