गुरव समाजाच्या अधिवेशनाला चंदगडमधून कार्यकर्ते जाणार

KolhapurLive


चंदगड, ता. ७ : राष्ट्रीय गुरव महासंघातर्फे रविवारी (ता. ११) सोलापूर येथील गुरव समाजाच्या अधिवेशनासाठी तालुक्यातून चारशे समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष विजय गुरव यांनी सांगितले.           गुरव समाजाची लोकसंख्या मोठी आहे. संघटि  नसल्याने  राज्यकर्त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. संघटितपणे लढा उभारण्यासाठी अधिवेशन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिवेशनात विविध  मागण्या मांडल्या  जातील. शैव  संस्कृती, वेद , पुराण आदींचे संशोधन व संवर्धनासाठी जिल्हास्तरावर दोन हजार चौरस मीटर जागा द्यावी,  ज्या देवस्थानाचे उत्पन्न नाही तेथे पुजाऱ्याला दरमहा २५ हजार मानधन द्यावे, मंदिरातील उत्पन्नासाठी कायदा करावा.मंगलवाद्य वादक, तुतारी वादकांना दरमहा दहा हजार मानधन द्यावे, मराठा समाजाच्या धर्तीवर  संत काशिबा महाराज महामंडळ स्थापना करावे . देवस्थान समितीवर गुरव समाजातील प्रतिनिधींची नेमणूक करावी ,आदी मागण्यांचा समावेश आहे .२२ वर्षानंतर अधिवेशन होत आहे.