गडहिंग्लज : आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या मुगळी (ता.गडहिंग्लज)येथील एका महिलेचा गावाजवळच्या शेतवडीत आज मृतदेह आढळला. लक्ष्मी दुंडाप्पा आमिनभाव (वय ४८)असे मृताचे नाव आहे. एक डिसेंबर रोजी त्या शेताकडे जातो असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता.दरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह गावाजवळच्या शेतात आढळून आला. मुलगा रमेश अमीनभावी यांनी पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे.अधिक तपास हवालदार अरुण पाटील करत आहेत.