गडहिंग्लज : मुंगूरवाडी ( ता. गडहिंग्लज ) येथील सौ. व. भि. नौकुडकर हायस्कूलची विद्यार्थिनी ममता पाटील हिने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. २०० मीटर व ४०० मीटर धावणे प्रकारात तिने हे यश मिळविले. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. ममताला मुख्याध्यापक ए. सी. देशमाने, क्रीडाशिक्षक व्ही . एम . होडगे यांचे मार्गदर्शन लाभले.