क्रिएटिव्हच्या नूपुर लोखंडेचे यश

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील क्रिएटीव्ह हायस्कूलची विद्यार्थिनी नूपुर लोखंडे हिने रिदमीक योगा स्पर्धेत यश मिळविले. विभागीय स्पर्धेत तिने चौथा क्रमांक मिळविला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडाशिक्षक नानासाहेब सुतार, पुंडलिक मोहनगेकर, सचिन पोवार यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री, मुख्याध्यापक दिनकर रायकर यांचे प्रोत्साहन लाभले.