आजरा : आजार साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अशोक काशीनाथ चराटी यांची जिल्हा नियोजन विकास समितीवर शासन प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. यानिमित्त गवसे (ता.आजर) येथे कारखाना कार्यस्थळावर झालेल्या संचालक मंडळाचे सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक मुकुंदराव देसाई एम.के.देसाई, अंजनाताई रेडेकर, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे,सुनिता रेडेकर, ऍड .लक्ष्मण गुडुळकर, दशरथ अमृते,अनिल फडके, आनंद कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक,कार्यकारी संचालक टी.ए.भोसले,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.